Saturday, November 17, 2012

बाळासाहेब गेले; एक पर्व संपले...मराठी मन सुन्न (Bal Thackeray passes away)

 
 
मराठी अस्मितेचा बुलंद आवाज... ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते... देशाच्या राजकारणातील चमत्कार... लाखो ह्दयांचे अनभिषिक्त सम्राट... तमाम शिवसैनिकांचे आधारवड... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आज, शनिवारी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. दुपारी ३.३३ वाजता बाळासाहेबांनी अखेरचा श्वास घेतल्याचं डॉक्टर जलील परकार यांनी सांगितलं आणि बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणा-या शिवसैनिकांच्या दुःखाला पारावार उरला नाही. गेली साडेचार दशकं आपल्या एका ' आदेशावर ' देशाचं राजकारण फिरवणा-या या महानेत्याच्या निधनामुळे अवघं मराठी मन सुन्न झालं आहे.

बाळासाहेबांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरीच खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रासही जाणवत होता. लीलावती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मंगळवारी त्यांची तब्येत अधिकच नाजुक झाल्यानंतर त्यांना सातत्यानं ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर, अखेरच्या क्षणी बाळासाहेबांना व्हेंटिलेटरवर ठेवून डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. मात्र, या उपचारांना प्रतिसाद देणे थांबले आणि वांद्रे येथील ' मातोश्री ' निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीय मृत्यूसमयी त्यांच्यासोबत होते.

शिवसेनेच्या स्थापनेपासून महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवन ढवळून काढणारे ' बाळासाहेब ठाकरे ' नावाचे वादळ गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे काहीसे शांत झाले होते. मागच्या दोन वर्षांपासून त्यांनी सक्रीय राजकारणातून अंग काढून घेतले होते. शिवसेनेचा दसरा मेळावा, महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा, वरळीच्या जांभोरी मैदानात झालेले वारकरी संमेलन, महापालिका निवडणुकीची शिवतीर्थावरील सभा आणि जुहूतील एका हॉटेलात झालेले पुस्तक प्रकाशन असे मोजके कार्यक्रम वगळता बाळासाहेबांनी घराबाहेर पडणे बंद केले होते. ' मातोश्री ' वरूनच ते शिवसेनेचे संघटनात्मक निर्णय घेत होते. पक्षाच्या मुखपत्रातून भूमिका मांडत होते. उद्धव ठाकरे यांना मार्गदर्शन करत होते. लोकांच्या भेटीगाठीही घेत होते.

नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी शिवसैनिकांना व्हिडीओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत शिवसैनिकांना आपल्या ढासळत्या प्रकृतीची कल्पना दिली होती. बाळासाहेबांचे ते भाषण पाहून, धीरोदात्त नेत्याचं हे भावनिक आवाहन ऐकून हजारो शिवसैनिकांचं मन हेलावलं होतं. सा-यांनाच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता लागून राहिली होती. आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृतीला आराम पडावा अशी प्रार्थना शिवसैनिकच नव्हे, तर इतर पक्षांतील त्यांचे चाहतेही मनोमन करत होते. अनेक बड्या राजकीय नेतेमंडळींनी, सामाजिक-सांस्कृतिक-कला क्षेत्रातील मान्यवरांनी ' मातोश्री ' वर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. बाळासाहेबांच्या दीर्घायुसाठी यज्ञही केले जात होते. मात्र, ' जातस्य हि ध्रुवा मृत्यु ' या उक्तीप्रमाणे अखेर ती दुर्दैवी बातमी आली. बाळासाहेब नावाचं एक वादळी पर्व संपलं आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला, देश-विदेशातील मराठी माणूस सुन्न झाला.
Signaling the end of an era in Maharashtra politics, Shiv Sena chief Bal Thackeray breathed his last at around 3.30 pm on Saturday at his residence ‘Matoshree’ after days of uncertainity over his health condition. At around 5 pm announcing his demise, his physician Dr. Jalil Parkar told the media that though doctors tried their best to revive Mr. Thackeray, their efforts were not successful and the Sena leader died of a cardiac arrest.
Shiv Sena MP Sanjay Raut called on Sainiks to maintain peace and said that Mr. Thackeray’s body would be kept for a final “darshan” at Shivaji Park from 10 am onwards on Sunday. The funeral is expected to be held later in the day. “Balasaheb's life has been one of strict discipline,” Mr. Raut exhorted, asking party workers to make sure nothing untoward happened. Weeping Shiv Sainiks received the news outside "Matoshree" as the police struggled to pacify the large mob. The disbelieving crowd demanded to see Mr. Thackeray or hear the news from his son, Uddhav.
As the news spread, shops downed shutters and roads emptied out and the city is expected to be totally closed on Sunday. Over 20 lakh people are expected to attend the funeral on Sunday.
Sena leaders had held out a glimmer of hope in the past few days calling for prayers to improve their leader’s health, hoping for a miracle. Mr Thackeray was on a non-invasive ventilator since a while and his health has been suspect since he visited Lilavati hospital for a check-up in July after complaints of breathlessness. Earlier in May he had already been once to the same hospital.
He had an angioplasty in 2009 and in 1990, a bypass surgery. He was suffering from chronic obstructive pulmonary disease (COPD) and later in July, he was diagnosed with pancreatic ailments. He skipped the annual Dussehra rally in October and instead a video recording of his speech was aired to a large crowd at Shivaji Park. He publicly acknowledged his ill health and appealed to the crowd to stand by his son Uddhav and grandson Aditya. He spent his last days at home, in a room which functioned like an ICU attended by his family and teams of doctors.
 


No comments: